Child abuser sent to juvenile detention center. The incident happened in Khalumbre.

Photo of author

By Sandhya

चिमुरड्यावर अत्याचार करणाराची
बालसुधारगृहात रवानगी,.
खालुंब्रे येथे घडला होता प्रकार,.

चाकण : प्रतिनिधी
तीन वर्षीय बालकावर लैंगिक अत्याचार करून त्याची निर्घृण हत्या करणाऱ्या अल्पवयीन नराधमाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. खेड तालुक्यातील खालुंब्रे येथे हा प्रकार घडला होता.
रियान्सू कमलेश रावत (वय ३ वर्षे) असे खून झालेल्या बालकाचे नाव आहे. सीमा कमलेश रावत (वय ३० वर्षे, सध्या रा. खालुंब्रे, ता. खेड, मुळगाव लालगाव, मोहरिया, ता. सिरमल, जि. रिवा, मध्यप्रदेश) यांनी याप्रकरणी महाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
अल्पवयीन आरोपी खून करून बिहारमध्ये फरार होण्याच्या तयारीत असतानाच महाळुंगे पोलिसांनी या भागातील सीसीटीव्ही, तांत्रिक व गोपनीय माहितीनुसार आरोपीचा शोध घेऊन त्यास पुणे रेल्वे स्टेशन येथून शिताफीने ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या आहेत.
पिंपरी – चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, अप्पर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त महाळुंगे विभाग सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली महाळुंगे इंगळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस निरीक्षक अनिल देवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली, पोलीस उपनिरीक्षक पिंजारी, पोलिस अंमलदार विश्वास नाणेकर, किशोर सांगळे, चेतन सावंत, गोरख गाडीलकर, शरद खैरे, राजेंद्र खेडकर, राजेश गिरी, महेश गायकवाड, राजकुमार हनुमंते, योगेश तिडके प्रशांत कसबे, शिवाजी मरकड आदींनी ही कामगिरी केली.

Leave a Comment

You cannot copy content of this page