Sunetra Pawar wins Baramati assembly by-election

Photo of author

By Sandhya

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा विजय

पुणे, दि. ४ (जिमाका वृत्तसेवा) : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज पार पडली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनेत्रा अजित पवार यांनी विजय संपादन केला आहे. त्यांनी एकूण २ लाख १८ हजार ९६९ मते मिळवत विजयी झाल्या.

या निवडणुकीत प्रा. आर. वाय. घुटुकडे (नवीन राष्ट्रीय समाज पार्टी) यांना ९३५ मते, तर सतीश कृष्णा कदम (हिंदुस्थान जनता पार्टी) यांना १७० मते मिळाली.
अपक्ष उमेदवारांमध्ये डॉ. अभिजित वामनराव बिचुकले (३३३), ॲड. अविनाश वामनराव गायकवाड (९२), करुणा धनंजय मुंडे (३०१), गजानन शांताबाई उत्तम गवळी पाटील (४७), चंद्रकांत रंभाजी मोटे (४२), चंद्रकांत सूर्यकांत वाघमोडे (४०३), दत्तात्रय रावसो बेदरे (४३), बाळासो मारुती धापटे (५७), रोहित राजू भोसले (७०), मिथुन सोपानराव आटोळे (१२३), मंगलदास तुकाराम निकाळजे (१३७), योगेश मोहन योमो (५०), डॉ. विजयकुमार रामचंद्र भिसे (२९८), विराज महादेव शिंदे (५३३), शिवाजी जयसिंग कोकरे (१४६), सतीश नाना सोनवणे (४८), सागर शरद भिसे (४५), साजन भगवान अडसूळ (८५), सिताराम विठ्ठल रणदिवे (४५) आणि सोनाली सूर्यकांत राणे (१३२) यांनी मते मिळवली. ‘नोटा’ला ७७४ मते मिळाली.

निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांच्या हस्ते सुनेत्रा पवार यांच्या प्रतिनिधी किरण गुजर यांना फॉर्म २२ नुसार विजयाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

Leave a Comment

You cannot copy content of this page