

विजयानंतरही न थांबता जनसंवाद; जयदादा पवारांचा कार्यकर्त्यांसोबत मॅरेथॉन संवाद.
बारामती – विधानसभा पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या विक्रमी विजयाच्या पार्श्वभूमीवर जयदादांनी तात्काळ जनसंवादाला प्राधान्य दिले.
आज सकाळी १०:३० वाजता सुरू झालेली बैठक सायंकाळी ५ वाजेपर्यंत अखंड सुरू राहिली. सुमारे ६ तास ३० मिनिटांच्या या मॅरेथॉन संवादात दोन जिल्हा परिषद गट आणि माळेगाव नगरपंचायतीतील कार्यकर्त्यांशी थेट चर्चा करण्यात आली.
या बैठकीत कार्यकर्त्यांच्या भावना, अपेक्षा आणि सूचनांना मनापासून ऐकून घेण्यात आले. प्रत्येक कार्यकर्त्याशी संवाद साधत त्यांच्या सहभागाला महत्त्व देणे, हीच प्रभावी नेतृत्वाची खूण असल्याचे यातून दिसून आले.
जय पवारांचा या उपक्रमातून विजय साजरा करण्यापेक्षा जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तात्काळ कामाला लागणे, हीच खरी नेतृत्वाची जबाबदारी असल्याचा संदेश देण्यात आला.