
जिल्ह्यात ६६ हजाराहून अधिक नागरिकांनी केली स्व-गणना-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
पुणे, दि. ५: भारताच्या १६ व्या जनगणनेला १ मे पासून सुरुवात झाली असून आजअखेर जिल्ह्यातील ६६ हजार १९३ इतक्या नागरिकांनी स्व-गणना केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.
जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला जिल्ह्यात सुरुवात करण्यात आली नागरिकांनी https://se.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करुन १५ मे २०२६ अखेर कालावधीत स्व-गणना पूर्ण करावी. स्व-गणना ही ऐच्छिक आहे. माहिती गोळा करण्यासाठी आणि नोंदविण्यासाठी प्रगणक १६ मे ते १४ जून २०२६ दरम्यान प्रत्येक घराला भेट देणार आहे. यावेळी प्रगणकांद्वारे गृहगणना करण्यात येणार असून नागरिकांनी आपल्याशी निगडित अचूक माहिती त्यांना द्यावी.
आपल्या परिसरातील नागरिकांनाही अद्ययावत माहितीसह स्व-गणना करण्यास प्रोत्साहित करावे, जिल्ह्यातील सर्व आपली जबाबदारी मानून या प्रक्रियेत सक्रियपणे सहभाग घ्यावा, असे आवाहन श्री. डुडी यांनी केले आहे.