There is no bridge at Patas railway station, a woman saved her life by sleeping on the tracks

Photo of author

By Sandhya

पाटस रेल्वे स्थानकावर पूल नसल्याने थरार; महिलेने ट्रॅकवर झोपून वाचवला जीव

पुणे, – पुणे विभागातील पाटस रेल्वे स्थानकावर पादचारी पुलाची अपुरी व्यवस्था प्रवाशांच्या जिवावर बेतली आहे. आज एका महिलेला रुळ ओलांडताना अचानक मालगाडीचा सामना करावा लागला. प्रसंगावधान राखत तिने ट्रॅकवर झोपून जीव वाचवला. हा थरारक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, प्लॅटफॉर्म क्रमांक १ ते २ दरम्यान पूल बांधण्यात आला असला, तरी प्लॅटफॉर्म क्रमांक २ च्या पुढील दोन अतिरिक्त रुळांसाठी कोणतीही सुविधा नाही. या रुळांवरून मालगाड्यांची वर्दळ सुरूच असते. मात्र, प्रवाशांना जीव धोक्यात घालून हे रुळ ओलांडावे लागतात.

या अपुऱ्या सुविधेमुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाने तातडीने अतिरिक्त पुलाची सोय करावी, अशी मागणी होत आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page