
मुंबईतील ३५० हून अधिक शाळांमधील ‘पीएफ’ चोरीविरोधात १ *जूनपासून राज्यस्तरीय एल्गार;
डॉ. विशाल कडणे यांचा आक्रमक पवित्रा.
मुंबई आणि उपनगरातील सुमारे ३५० हून अधिक स्वयं-अर्थसहाय्यित (Self-Finance) शाळांमधील हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीवर (PF) डल्ला मारणाऱ्या व्यवस्थापनांविरुद्ध आता राज्यस्तरीय आंदोलन छेडण्यात येणार आहे. मुंबई शहर शिक्षक विकास मंडळ (रजि.) आणि शिक्षक नेते डॉ. विशाल कडणे यांच्या नेतृत्वाखाली येत्या १ जून २०२६ पासून हे तीव्र आंदोलन सुरू होत आहे.महत्त्वाची आकडेवारी आणि कायदेशीर वास्तव:कर्मचारी संख्या: मुंबई विभागातील साधारणपणे ३५० ते ४०० शाळा अशा आहेत, जिथे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या २० ते ७५ च्या दरम्यान आहे.बाधित कर्मचारी: एका अंदाजानुसार, मुंबईतील सुमारे १५,००० ते २०,००० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आजही पीएफच्या लाभापासून वंचित आहेत.कायदेशीर तरतूद: ‘कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कायदा १९५२’ नुसार, २० पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या कोणत्याही संस्थेने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडे (EPFO) नोंदणी करणे आणि १२% हिस्सा जमा करणे कायदेशीररित्या अनिवार्य आहे.
आर्थिक नुकसानीचा तक्ता (संभाव्य):
तपशीलअंदाजित रक्कम (प्रति महिना)
कर्मचाऱ्याचा हिस्सा (१२%)₹ १,८०० – ₹ ३,६००
व्यवस्थापनाचा हिस्सा (१२%)₹ १,८०० – ₹ ३,६००
एकूण मासिक बचत₹ ३,६०० – ₹ ७,२००
या कपातीमुळे कर्मचाऱ्यांना केवळ बचतच नाही, तर EDLI (विमा योजना) अंतर्गत ७ लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण आणि पेन्शन देखील मिळते.
व्यवस्थापन हा हिस्सा वाचवून कर्मचाऱ्यांच्या भविष्याशी खेळत आहे.
डॉ. विशाल कडणे यांचा इशारा – BOX Quote with Vishal Kadne Photo
अनेक शाळांमधील कर्मचाऱ्यांनी डॉ. विशाल कडणे यांची भेट घेऊन गाऱ्हाणेमांडल्यानंतर त्यांनी या* लढ्याचे नेतृत्व स्वीकारले आहे.”पीएफही शिक्षकांच्या* हक्काचीपुंजी आहे. २० पेक्षा जास्त कर्मचारी असूनही जे व्यवस्थापन पीएफ देत नाही, त्यांच्यावर गुन्हे दाखलकरण्यासाठी आम्ही सरकारकडे पाठपुरावा करू. १* जूनपासून होणारे आंदोलन हे निर्णायक असेल.”— डॉ. विशाल कडणे (मुंबईशिक्षक नेते)*
कर्मचाऱ्यांना आवाहन – ज्या शाळांमध्ये कर्मचारी संख्या २० च्या वर असूनही पीएफ कपात केली जात नाही, अशा शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी न घाबरता पुढे यावे. ही माहिती गोपनीय ठेवून आपल्या हक्कासाठी लढा दिला जाईल, असे आवाहन भगवान सागर आणि मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाच्या कार्यकारणीने केले आहे.एकजूट दाखवा, सुरक्षित भविष्य मिळवा !