


एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीत नवी क्रांती; गोविंदबागेत शरद पवार साहेबांसमवेत ऊस व केळी पिकाची पाहणी
Sharad Pawar यांच्या दूरदृष्टीतून शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाची नवी क्रांती आकार घेत असून, बारामती येथील गोविंदबाग शारदानगर येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) च्या माध्यमातून विकसित करण्यात आलेल्या ऊस व केळी पिकांची पाहणी नुकतीच उत्साहात पार पडली. यावेळी एआय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पिकांमध्ये होत असलेल्या सकारात्मक बदलांची सविस्तर माहिती कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ व एआय तज्ज्ञ डॉ. विवेक भोईटे यांनी उपस्थितांना दिली.
या आधुनिक तंत्रज्ञानामुळे ऊसाची जाडी वाढणे, कांड्याचा पेरा लांब होणे, फुटव्यांचे नियंत्रण राहणे तसेच उत्पादन खर्च कमी करून अधिक गुणवत्तापूर्ण उत्पादन घेणे शक्य होत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवत शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडवून आणण्याचे ध्येय समोर ठेवून पवार साहेब या वयातही अहोरात्र मेहनत घेत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा शेती क्षेत्रातील प्रगल्भ नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या शरद पवार साहेबांनी देशात फलोत्पादन क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली. १९८९ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शंभर टक्के फळबाग योजना राबवून राज्यातील गरीब शेतकऱ्यांच्या शेतात फळपिक लागवडीची क्रांती घडवून आणली. त्यानंतर केंद्रीय कृषिमंत्री पदाची धुरा सांभाळताना NHM आणि NHB योजनांद्वारे देशभर फळबाग शेती वाढीसाठी महत्त्वपूर्ण धोरणे राबविली. परिणामी महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांतून फळपिकांची निर्यात मोठ्या प्रमाणावर वाढली आणि देशाला परकीय चलन मिळण्यास मोठी मदत झाली.
सेंद्रिय व विषमुक्त शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी मा. Yugendra Pawar यांच्या नेतृत्वाखाली महाऑरगॅनिक अँड रेशेड्युफ्री फार्मर्स असोसिएशन (मोर्फा) ची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेमार्फत राज्यातील शेतकऱ्यांना उत्पादन, तंत्रज्ञान व मार्केटिंगबाबत सातत्याने मार्गदर्शन केले जात आहे.
आदरणीय साहेब यांनी मागील पाच वर्षांत सेंद्रिय व विषमुक्त शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्य व केंद्र शासन स्तरावर अनेक बैठका घेऊन शासन निर्णय करण्यातही मोलाचे योगदान दिले आहे.
या पिक पाहणी प्रसंगी मा. युगेंद्रदादा पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीशमामा खोमणे, सदाशिव बापू सातव, प्रा. डॉ. दिपक पवार, कृषिभूषण प्रल्हाद वरे, गणपत देवकाते, ॲड. राजेंद्र काटे, सुशीलकुमार जगताप, गौरव जाधव, विनय शेळके, शिरूभाऊ येळे आदी मान्यवर उपस्थित होते.
देशातील तरुण शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्थान ठरलेल्या शरद पवार साहेबांना मोर्फा व देशातील तमाम शेतकऱ्यांच्या वतीने निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.