One killed, five injured in triple accident involving tempo, car, two-wheeler: Incident on Pabal-Kanhur Mesai Road in Shirur

Photo of author

By Sandhya

टेम्पो,कार,दुचाकीच्या तिहेरी अपघातात एक ठार तर पाच जण जखमी : शिरूरच्या पाबळ-कान्हूर मेसाई रोडवरील घटना
शिरूरच्या पश्चिमेकडील पाबळ जवळील कान्हूर मेसाई रस्त्यावर सोमवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास टेम्पो,कार,दुचाकीच्या तिहेरी अपघातात एक ठार तर पाच जण जखमी झाल्याची घटना घडली.या भीषण अपघातात पाबळ येथील रिक्षाचालक भास्कर शिवलाल मकवाणे या ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला.तर कान्हूर मेसाईच्या घोलपवाडी येथील आशा बाळू घोलप, खैरेनगरचे ४२ वर्षीय दुचाकीस्वार सतीश भाऊसाहेब खैरे,पाबळ जवळील मोटारचालक संभाजी भगवान जाधव,गणेश बबन आगरकर,काळूराम तुकाराम चौधरी अशी या अपघातातील जखमींची नावे आहेत.याप्रकरणी सुधीर सदाशिव मकवाणे यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,सोमवारी सकाळच्या सुमारास पाबळकडून येणारी कार एम एच १२ टी के ३१६९ अचानक विरुद्ध दिशेला गेल्याने समोरून येणाऱ्या रिक्षा क्रमांक एम एच १४ ई एच २६५० यांची सामोरा समोर जोरदार धडक झाली. त्याचवेळी शेजारून जाणाऱ्या दुचाकीला एम एच १२ एच एक्स ९४९६ कारची देखील धडक बसली. यामध्ये रिक्षा टेम्पो व कार च्या समोरच्या बाजूने मोठे नुकसान झाले तर रिक्षा चालकाचा मृत्यु झाला.या अपघातात महिलेसह पाच जण जखमी झाले आहेत.दुचाकीस्वार थोडक्यात बचावला आहे. पोलिसांनी मोटारचालक संभाजी भगवान जाधव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस हवालदार संतोष शेळके करत आहेत.नशीब बलवत्तर म्हणून या अपघातात शिरूर तालुक्यातील खैरेनगरचे माजी उपसरपंचसतीश खैरे हे या अपघातात थोडक्यात बचावले.

Leave a Comment

You cannot copy content of this page