भिवंडी एसटी स्टँडचा पुनर्विकास होणार ₹१४.१८ कोटी निधी राज्य सरकार कडून मंजूर

भिवंडीच्या अत्यंत जीर्ण झालेल्या एसटी स्टँडच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने स्टंडच्या पुनर्बांधणीसाठी १४.१८ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. स्टंडच्या काम केव्हा सुरू होईल हे सांगणे कठीण असले तरी, हा निधी मिळवण्यासाठी लोकप्रतिनिधींमध्ये चढाओढ सुरू आहे.
भिवंडी एसटी स्टँडचे उद्घाटन २० मार्च १९७२ रोजी झाले. त्याच्या बांधकामाला सुरुवात होऊन ५४ वर्षे झाली आहेत. एसटी कॉर्पोरेशनच्या देखभालीच्या अभावामुळे संपूर्ण इमारत पडझडीच्या अवस्थेत आली आहे. देखभालीच्या अभावामुळे इमारतीचे स्लॅब वारंवार कोसळतात. खांबांना तडे गेले असून त्यातून लोखंडी सळ्या उघड्या पडल्या आहेत. स्टँडच्या परिसर खड्ड्यांनी भरलेला आहे. पावसाळ्यामध्ये या बस स्टॅन्डला पूर भरण्याचे दृश्य पाहायला मिळते.या इमारतीचे मजले जीर्ण अवस्थेत असल्याने स्टेशनपर्यंत पोहोचणे अवघड झाले आहे.
रोज प्रवास करणारे प्रवासी, बस कंडक्टर आणि चालक यांना भीतीच्या छायेत जगावे लागत आहे. काही वर्षांपूर्वी महानगरपालिकेने एसटी डेपोची इमारत धोकादायक घोषित केली होती. तेव्हापासून, राज्य सरकारकडे तिच्या पुनर्बांधणीची मागणी केली जात आहे. अखेरीस, राज्य सरकारने १४.१८ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. प्रत्यक्ष मंजुरी ते नवीन बस स्टॅन्ड उभे राहण्यापर्यंतची प्रतीक्षा मात्र रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अत्यंत
क्लेशदायक ठरणार आहे.