Today, June 5, 2026, in the evening, there was a sudden heavy rain accompanied by a strong wind in Baramati city.

Photo of author

By Sandhya

बारामती शहरात आज दिनांक 5 जून 2026 रोजी सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या नैसर्गिक आपत्तीमुळे शहरातील अनेक भागात झाडे उन्मळून पडली, तसेच काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचून वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.या घटनेची माहिती मिळताच बारामती नगरपरिषदेच्या वतीने मा.नगराध्यक्ष व मा. मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ आपत्ती व्यवस्थापन पथक कार्यान्वित करण्यात आले.
नगरपालिकेचे आपत्तीव्यवस्थापन पथक,सदस्य/सदस्या यांनी शहरातील सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करून तत्काळ शहरातील मुख्य रस्ते व अंतर्गत मार्गांवर उन्मळून पडलेली मोठी झाडे व तुटलेल्या फांद्या JCB व क्रेनच्या सहाय्याने तत्काळ हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
तसेच शहरात काही ठिकाणी पाणी तुंबलेल्या भागातील गटारांमध्ये अडकलेला कचरा, फांद्या व गाळ काढून पाण्याचा निचरा करण्यात आला.गटारे तात्काळ साफ करण्यात आले.

Leave a Comment

You cannot copy content of this page