Various programs organized in Pune district on the occasion of International Yoga Day.

Photo of author

By Sandhya

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन
माननीय महापौर मंजुषाताई नागपुरे यांचे नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध योग व तंदुरुस्तीविषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पुणे महानगरपालिकेच्या माननीय महापौर मंजुषाताई नागपुरे यांनी केले आहे.

जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, सेवाभावी शैक्षणिक संस्था, क्रीडा संकुले, क्रीडा मंडळे, क्रीडा संघटना, युवक मंडळे, महिला मंडळे तसेच क्रीडा क्षेत्रात कार्यरत संस्थांनी अधिकाधिक लोकसहभागासह आंतरराष्ट्रीय योग दिनाचे कार्यक्रम आयोजित करावेत. दिनांक २१ जून २०२६ रोजी सकाळी ७ ते ७.४५ या वेळेत अधिकृत सामूहिक योग प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच स्थानिक गरजेनुसार विविध योग व तंदुरुस्तीविषयक उपक्रमांचे आयोजन करून नागरिकांचा व्यापक सहभाग सुनिश्चित करावा, असेही महापौर मंजुषाताई नागपुरे यांनी म्हटले आहे.

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन २०१९ मध्ये सुरू केलेल्या ‘फिट इंडिया मूव्हमेंट’चा उद्देश प्रत्येक नागरिकाने तंदुरुस्तीचा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून स्वीकार करावा हा आहे. या संकल्पनेच्या अनुषंगाने देशभर योग व विविध शारीरिक तंदुरुस्तीच्या उपक्रमांद्वारे नागरिकांना नियमित व्यायामासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे.

दरवर्षी २१ जून रोजी साजरा होणारा आंतरराष्ट्रीय योग दिन हा योगाला सर्वांगीण आरोग्य व कल्याणासाठी जीवनपद्धती म्हणून प्रोत्साहन देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. यावर्षीच्या १२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची अधिकृत संकल्पना “Yoga for Healthy Aging” अशी आहे.

योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांची माहिती, छायाचित्रे, वृत्तपत्र कात्रणे, सहभागी युवक-युवती, ज्येष्ठ नागरिक व सर्वसामान्य नागरिकांची संख्या आदींचा सविस्तर अहवाल कार्यक्रमानंतर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या dsopune6@gmail.com या ई-मेलवर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

स. प. महाविद्यालय मैदान, पुणे येथे मुख्य कार्यक्रमाचे आयोजन

पुणे महानगरपालिका व जिल्हा प्रशासन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २१ जून २०२६ रोजी स. प. महाविद्यालय मैदान, पुणे येथे ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी माननीय महापौर मंजुषाताई नागपुरे यांनी विशेष पुढाकार घेतला असून नागरिकांच्या व्यापक सहभागासाठी विविध स्तरांवर नियोजन करण्यात आले आहे.

सकाळी ६ वाजता उपस्थिती नोंदणी होणार असून सकाळी ७ ते ७.४५ या वेळेत सामूहिक योग सत्र आयोजित करण्यात येणार आहे. पुणे शहर व जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंतरराष्ट्रीय योग दिन यशस्वी करावा, असे आवाहन माननीय महापौर मंजुषाताई नागपुरे यांनी केले आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page