Work on the temple corridor has begun with a fund of ₹1,500 crore – Union Home Minister Amit Shah.

Photo of author

By Sandhya

1500 कोटी रुपयांच्या निधीतून मंदिर कॉरिडॉरचे काम सुरू – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

दक्षिण भारताची काशी म्हणून ओळखले जाणारे करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर शासनाच्या तब्बल 1500 कोटी रुपयांच्या निधीतून खर्च करून हा परिसर विकास कॉरीडॉर म्हणून विकसित करण्यात येणार आहे. ही बाब सर्व भाविकांसाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याचे गौरोद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काढले.

पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित कृतज्ञता सोहळा सभेत केंद्रीय गृहमंत्री श्री. शाह बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्रशिक्षण चंद्रकांत (दादा) पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, नगर विकास राज्यमंत्री तथा कोल्हापूरच्या सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी मंत्री रवींद्र चव्हाण खासदार सर्वश्री धनंजय महाडिक, धैर्यशील माने, आमदार सर्वश्री डॉ. विनय कोरे, डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, अमल महाडिक, चंद्रदीप नरके, डॉ. अशोकराव माने, शिवाजी पाटील, निरंजन डावखरे, जिल्हा परिषद अध्यक्ष शिल्पा खोत, महापौर रुपाराणी निकम, माजी आमदार प्रकाश आवाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

केंद्रीय गृहमंत्री श्री. शाह म्हणाले, 7 व्या शतकातील या प्राचीन मंदिराच्या परिसरातील सुमारे 41 छोट्या-मोठ्या मंदिराचे संरक्षण करून येथील परिसर पुढील 6 महिन्याच्या आत विकसित करण्यात येणार आहे. या ठिकाणी अन्नछत्र सुरू करण्याबाबत आपण सकारात्मक आहोत. आपल्या वारशाचे, संस्कृतीचे जतन, संवर्धन करणे आणि त्याला चालना देणारे हे शासन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कारर्कीदीत आर्थिक, संरक्षण, सुरक्षा या सर्वच क्षेत्रात झालेल्या प्रगतीची मांडणी करताना देशातील घुसखोरांना अत्यंत बारकाईने शोधून काढण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. तसेच देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ग्रामीण व शहरी भागातील विकास गतीने सुरू असल्याचेही श्री शाह म्हणाले.

Leave a Comment

You cannot copy content of this page