




छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त पुणे महानगरपालिकेत महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन.
समता, सामाजिक न्याय आणि शिक्षणाचा दीप प्रज्वलित करणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुणे महानगरपालिका भवन येथे महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपमहापौर परशुराम वाडेकर, विरोधी पक्षनेते ॲड. निलेश निकम, सन्माननीय नगरसेवक, महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना महापौर मंजुषा नागपुरे यांनी राजर्षी शाहू महाराज यांनी सामाजिक समता, शिक्षण प्रसार आणि वंचित घटकांच्या उन्नतीसाठी केलेले कार्य आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे नमूद केले. समाजातील सर्व घटकांना न्याय आणि समान संधी मिळवून देण्यासाठी त्यांनी दिलेला विचार पुढील पिढ्यांसाठी दिशादर्शक ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा आदर्श समाजात समतेची भावना अधिक दृढ करणारा असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.