खलिस्तान समर्थक आणि ‘वारीस पंजाब दे’चा प्रमुख अमृतपाल सिंग अखेर पोलिसांच्या ताब्यात आला आहे. पंजाब पोलिसांनी फरार अमृतपाल सिंगला मोगा येथून अटक केली आहे. अमृतपाल १८ मार्चपासून फरार होता.
पोलिसांनी त्याचा काका आणि अनेक साथीदारांना देखील अटक केली आहे. पंजाब पोलिसांनी अमृतपालच्या अटकेला दुजोरा दिला आहे. अमृतपालला मोगा येथून अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. यासोबतच लोकांना फेक न्यूज शेअर करू नका असे देखील सांगण्यात आले आहे.