हेलिकॉप्टरमध्ये सेल्फी घेताना अधिकार्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना केदारनाथ येथे आज (दि.२४) घडली. जितेंद्र कुमार सैनी असे त्यांचे नाव आहे.
जितेंद्र कुमार हे रविवारी सकाळी हेलिकॉप्टरमधून बाहेर बघत सेल्फी घेत होते. यावेळी त्यांना हेलिकॉप्टरचे पाते ( टेल रोटर ब्लेड) लागले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. जितेंद्र कुमार सैनी हे उत्तराखंड नागरी उड्डयन विकास प्राधिकरणमध्ये आर्थिक नियंत्रक म्हणून कार्यरत होते.