यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. यानंतर एकच खळबळ उडाली. धमकी मिळाल्यानंतर लखनऊमध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आपत्कालीन नंबर (112) वर कॉल करून अज्ञात व्यक्तीने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी दिली. भारतीय दंड संहिता (IPC) कलम 506, 507 आणि IT कायदा 66 अंतर्गत अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.धमकीचा फोन जाताच प्रशासन खडबडून जागे झाले. एका वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.