
दिल्लीतील मथुरा रोडवरील दिल्ली पब्लिक स्कूलला आज (दि.२६) सकाळी ई-मेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली आहे. धमकीनंतर शाळा मोकळी करण्यात आली असून, दिल्ली पोलीस शाळेच्या परिसराची झडती घेत आहेत.
मात्र अद्याप पोलिसांना परिसरात कोणतीही संशयास्पद गोष्ट सापडलेली नाही. घटनास्थळी तपास सुरू आहे, असे दिल्ली पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
शाळेच्या आवारात अद्याप कोणतीही संशयास्पद वस्तू न आढळल्याने कोणताही धोका नाही. परिस्थिती सामान्य आहे. दरम्यान शाळेच्या परिसरात बॉम्ब निकामी पथक, श्वान पथक आणि SWAT टीम दाखल आहेत. दरम्यान शाळेच्या इमारतींची स्वच्छता करण्यात येत आहे, अशी माहिती दक्षिण पूर्व दिल्लीचे DCP राजेश देव यांनी दिली आहे.