धरणात बुडून एका महाविद्यालयीन युवकाचा मृत्यू

Photo of author

By Sandhya

धरणात बुडून एका महाविद्यालयीन युवकाचा मृत्यू

तळेगाव एमआयडीसी जवळील जाधववाडी धरणात बुडून एका महाविद्यालयीन युवकाचा मृत्यू झाला. ही दुर्घटना मंगळवारी (दि.२५) सायंकाळच्या सुमारास घडली. आदित्य शरद राहणे (वय २१) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्या दोन मित्रांना वाचविण्यात सुदुंबरे येथील एनडीआरएफ पथकाला यश आले आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भीमाशंकर दिनेश मठपती (वय २१), आदित्य निळे (वय २१) आणि आदित्य शरद राहणे (वय २१) हे तिघे तळेगाव दाभाडे स्टेशन भागातील नूतन इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी असून ते जाधववाडी धरण परीसरात मंगळवारी सायंकाळी ६.३०च्या सुमारास फिरण्यासाठी आले होते.

हे तिघे जाधववाडी धरण पाणलोट क्षेत्रातील पाण्यात उतरले. परंतु, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने आदित्य राणे हा पाण्यात बुडून मृत झाला. त्याला तळेगाव जनरल हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचारापूर्वीच तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करीत आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page