मोठा गौप्यस्फोट; संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका

Photo of author

By Sandhya

मोठा गौप्यस्फोट; संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. याशिवाय त्यांनी संजय राऊत यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

संजय राऊत यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं यासाठी त्यांनी  शरद पवारांकडे स्वत:च्या नावाचा प्रस्ताव दिला होता,’ असा दावा नितेश राणे यांनी केला आहे. “संजय राऊत यांनी 2019ला मुख्यमंत्री होण्यासाठी शरद पवारांकडे स्वत:च्या नावाचा प्रस्ताव दिला होता.

शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदासाठी संजय राऊत यांचं नाव उद्धव ठाकरेंकडे सूचवलं होतं. राऊतांना मुख्यमंत्री करा म्हणून सांगितलं होतं. पण उद्धव ठाकरेंच्या मनात वेगळच होतं. त्यांनी राऊतांचं नाव नाकारलं.

तेव्हापासून राऊत यांची नाटकं आणि षडयंत्र सुरू झाली आहेत. हा घरात घेण्याच्या लायकीचा नाही, दुसऱ्यांच्या घरात हा आग लावण्यापलीकडे काही करू शकत नाही,” असे नितेश राणे म्हणाले.

पुढे ते म्हणाले, “संजय राजाराम राऊत हे पूर्ण नाव किती लोकांना माहिती आहे? असं मला महाराष्ट्राला विचारायचं आहे. कुठल्या बापाचे नाव लावतोस हे संजय राऊतला विचारायचं आहे. कोणाचा बाप काढायचा, भांडण लावायचं, भावा भावात वाद लावायचं हे पहिल्यापासून त्याचे धंदे आहेत. पवार कुटुंबियातही भांडणे लावण्याचे काम त्याने सुरू केले आहे. पण अजितदादांनी त्याला खडसावले.

Leave a Comment

You cannot copy content of this page