या दिवशी ठरणार राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष….

Photo of author

By Sandhya

या दिवशी ठरणार राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वाय.बी.सेंटर येथे ‘लोक माझे सांगाती’ या त्यांच्या आत्मचरित्राच्या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात पक्षाच्या अध्यक्षपदावरून पायउतार होत असल्याचे जाहीर केले आणि सभागृहात एकच गोंधळ उडाला. शरद पवार यांच्या या निर्णयाला कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी जोरदार विरोध केला.

सभागृहात उपस्थित असणाऱ्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे यांना तर अक्षरशः अश्रु अनावर झाले. दरम्यान, कार्यकर्त्यांचा हट्ट पाहता शरद पवार यांनी दोन दिवसांचा कालावधी मागितला आहे.

शरद पवार दोन दिवस याबाबत विचार करणार आहेत. त्यानंतर ते आपला निर्णय जाहीर करणार सांगण्यात आलं आहे. मात्र, अश्यातच एक मोठी बातमी समोर आली असून शरद पवार हे नेमकं कोणत्या दिवशी आपला निर्णय जाहीर करणार हे सांगण्यात आलं आहे.

एका प्रसिद्ध वृत्तवानिनीच्या वृत्तानुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नवा अध्यक्ष असणार याबाबत 5 मे ला बैठक होणार आहे. शरद पवार यांनी जाहीर केलेल्या निवड समितीची 5 मे ला बैठक होईल. विशेष म्हणजे निवड समितिची 6 मे ला बैठक होणार होती. पण ही बैठक शरद पवार यांनी 5 मे ला घेतली आहे.

तसेच, या निवड समिती बैठकीत जो निर्णय घेईल तो आपल्याला मान्य असेल, असं शरद पवार यांनी सांगितलं आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं. तर दुसरीकडे त्यांनी राजीनामा मागे घेतला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष कोण होणार? यावर जोरदार चर्चा घडताना पाहायला मिळत आहे. यामध्ये सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अजित पवार, प्रफुल्ल पटेल अशा अनेक नावांची चर्चा होत आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page