उद्धव ठाकरे बारसूत दाखल

Photo of author

By Sandhya

उद्धव ठाकरे बारसूत दाखल

बारसूच्या आंदोलकांना भेटण्यासाठी आलेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरचे कोंबे (राजापूर) येथे लॅडींग झाले.

त्यावेळी खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक यांच्यासह सेनेच्या नेत्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. त्यावेळी ठाकरे गटाकडून केलेल्‍या जोरदार घोषणांनी परीसर दणाणुन गेला.

स्वागतानंतर उद्धव ठाकरे बारसूकडे रवाना झाले. बारसुतील प्रकल्पग्रस्त जनतेची भेट घेवुन ते परीसरातील कातळशिल्पांची पहाणी करणार आहेत. तसेच ते गिरमादेवी कोंड येथे दुपारी पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.

उध्दव ठाकरेंसमवेत मोठा ताफा आहे. दरम्यान बारसू परीसरात पोलीस आणि आमदार भास्कर जाधव यांच्यात बाचाबाची झाली. पोलीसांनी रोखल्याने आमदार भास्कर जाधव संतप्त झाले.

Leave a Comment

You cannot copy content of this page