मणिपूरमधील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर; मृतांची संख्‍या ५४ वर

Photo of author

By Sandhya

मणिपूरमधील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर; मृतांची संख्‍या ५४ वर

मणिपूरमधील हिंसाचाराचा वणवा आता आटोक्‍यात येत आहे. राज्‍यात भारतीय सैन्‍यदलासह आसाम रायफल्‍स आणि रॅपिड ॲक्‍शन फोर्स तैनता केल्‍यानंतर परिस्‍थिती नियंत्रणात आली आहे. जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. दरम्‍यान, हिंसाचाराच्या विविध घटनांमध्ये राज्‍यात ५४ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

बुधवारी चुराचंदपूर जिल्ह्यातील तोरबांग भागात मणिपूरमधील बहुसंख्य मेईतेई समुदायाच्या अनुसूचित जमाती (एसटी) दर्जाच्या मागणीला विरोध करण्यासाठी. हिंसाचार उसळला. मागील तीन दिवस राज्‍यातील विविध भागात हिंसाचाराचा भडका उडत होता.

इम्फाळ खोऱ्यात आज (दि.६) बाजारपेठा आणि दुकाने सुरू झाली. रस्त्यांवर काही वाहने दिसू लागली आहेत. राज्यात आतापर्यंत दहा हजारांहून अधिक सुरक्षा दलाचे जवान तैनात आहेत. या कडेकोट बंदोबस्तामुळे इंफाळमध्ये लोक रस्त्यावर दिसू लागले आहेत.

हिंसाचारात पाच दहशतवादी ठार झाल्‍याचे राज्‍य सरकारने म्हटले आहे. चुरचंदपूर येथे झालेल्या वेगवेगळ्या चकमकीत राखीव बटालियनचे दोन जवान जखमी झाले. रचंदपूरमधील सायटन येथे झालेल्‍या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले. 

Leave a Comment