
भारतीय हवाई दलाचे मिग-21 ( MiG-21 Fighter Jet ) हे लढावू विमान आज ( दि. ८) राजस्थानमध्ये कोसळले. राजस्थानमधील बहलोलनगर जिल्ह्यात हा अपघात झाला आहे.
या दुर्घटनेतून दाेन स्थानिक महिलांचा मृत्यू झाला असून, वैमानिक सुरक्षित असल्याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. प्रशासनाने युद्ध पातळीवर मदतकार्य सुरु केले आहे. ( MiG-21 crashe )
बहलोलनगर जिल्ह्यात भारतीय हवाई दलाचे मिग-21 ( MiG-21 Fighter Jet ) हे लढावू विमान एका घरावर कोसळले. या घरातील दोन महिलांचा मृत्यू झाला असून एक पुरुष जखमी झाला आहे. येथे बचावकार्य सुरु आहे, अशी माहिती बहलोलनगरचे पोलीस अधीक्षक सुधीर चौधरी यांनी दिली.