
सिन्नर ते घोटी दरम्यान मुंबई नागपुर समृद्धी महामार्गाचे काम प्रगतीपथावर सुरु आहे. मात्र सोमवारी सायंकाळच्या सुमारास इगतपुरी तालुक्यातील बेलगाव तऱ्हाळे ते गांगडवाडी परिसरातील समृद्धी महामार्गावरील पूल काम सुरू असताना अचानक कोसळला. समृद्धी महामार्गावरुन जाणाऱ्या पुलाचे पिलर अचानक खाली कोसळले.
या पूलाचे काम प्रगतीपथावर सुरु होते. मात्र अचानक अशा पद्दतीने काम सुरु असतांना मुख्य रस्त्यावर असलेला ब्रिज कोसळल्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही.
नागपुर ते शिर्डी पर्यंत या समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण होऊन हा महामार्ग सुरु सुद्धा झाला आहे. सिन्नर पासून मुंबई पर्यंत काही ठिकाणी या महामार्गाचे काम प्रगती पथावर सुरु आहे. अशातच अशी घटना घडली आहे.