शिंदे फडणवीस सरकार वाचलं !

Photo of author

By Sandhya

शिंदे फडणवीस सरकार वाचलं !

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल अखेर आज आला. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी या निकालाचे वाचन सुरु केले. यावेळी नवाब रेबिया प्रकरण सात बेंचकडे पाठवले. यासोबत कोर्टाने राज्यपालाच्या कामावर देखील ताशेरे ओढले.

कोर्टाने नोंदवली महत्वाची निरीक्षणे

भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलवायला नको होती..

राज्यपालांकडे कोणतेही कारण नव्हते राज्यपालांचे सर्व निर्णय चुकीचे

ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर कोर्टाने सरकार परत आणलं असत

१६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांकडे.. त्यांनी निर्णय लवकरात लवकर घ्यावा

सुनील प्रभू योग्य प्रतोद कोर्टाचा निर्णय खरी शिवसेना कोण याचा निर्णय अध्यक्षांनी घ्यावा

अध्यक्षांनी निर्णय लवकरात लवकर घ्यावा – कोर्ट

सर्वोच्च न्ययालयाच्या या निकालानंतर राज्यातील राजकारण चांगलच बदलणार आहे. महाविकास आघाडीसह शिंदे आणि भाजपवर देखील या निर्णयाचा परिणाम होणार आहे. त्यासोबतच राज्यात होणाऱ्या आगामी निवडणुकांवर न्यायालयाच्या या निर्णयाचा काय परिणाम होतो हे पाहणं महत्वाचा ठरणार आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page