धक्कादायक : विजेचा धक्का लागल्याने १४ वर्षीय मुलीचा मृत्यू

Photo of author

By Sandhya

धक्कादायक : विजेचा धक्का लागल्याने १४ वर्षीय मुलीचा मृत्यू

विजेचा धक्का लागल्याने १४ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना यावल तालुक्यातील कोळवद गावात शुक्रवारी (दि. १२) सकाळी घडली. कोळवद येथील संजय बिस्मिल्ला तडवी यांची मुलगी मुस्कान संजय तडवी (१४) ही सकाळी ९ च्या सुमारास घरात पाणी भरण्यासाठी मोटर लावत होती.

यावेळी मोटारीत विजेचा प्रवाह उतरल्याने तिला विजेचा धक्का लागून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावेळी तत्काळ तिला यावल येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविले मात्र, तिला वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले. मुस्कान ही विकास विद्यालय सातोद (ता. यावल) येथे आठवीच्या वर्गात शिक्षण घेत होती.

Leave a Comment

You cannot copy content of this page