शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी रविवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि सध्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा केली. ठाकरेंसोबतच्या भेटीचे फोटो केजरीवाल यांनी ट्विटरवर पोस्ट केले आहेत.
त्यात केजरीवालांनी नमूद केले आहे की, मला आज माझ्या निवासस्थानी आदित्य ठाकरे यांचा पाहुणचार करण्याची संधी मिळाली. सध्याच्या राजकीय घडामोडींवर मी त्यांच्याशी सविस्तर संभाषण केले. शिवसेना आणि केजरीवाल यांच्या राजकीय जवळीकीचे सध्या मोठेच कुतुहल निर्माण झाले आहे.
मध्यंतरी स्वता: केजरीवालांनी मुंबईत दौरा करून उद्धव ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन चर्चा केली होती. आता अदित्य ठाकरे दिल्लीत जाऊन त्यांना भेटले आहेत. त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील मात्र अजून समजलेला नाही.