पुण्यातील खडकवासला धरणात ९ मुली बुडाल्या; दोघींचा मृत्यू

Photo of author

By Sandhya

पुण्यातील खडकवासला धरणात ९ मुली बुडाल्या; दोघींचा मृत्यू

पुणे: खडकवासला धरणात गोऱ्हे खुर्द येथे आज सकाळी पोहण्यासाठी उतरलेल्या नऊ मुली बुडाल्या होत्या. जवळच दशक्रिया विधीसाठी आलेल्या स्थानिकांनी त्यापैकी सात मुलींना सुखरूप पाण्यातून बाहेर काढले.

हवेली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पीएमआरडीएचे अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले होते. सात मुलींना वाचवण्यात आले असून कुमुद संजय खुर्द वय १३, शितल भगवान टिटोरे वय १५ या दोन मुलींचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page