सलमान खानची बहीण अर्पिता खान-शर्माने तिच्या घरातून महागड्या हिऱ्याचे झुमके चोरीला गेल्याची मुंबई पोलिसांत तक्रार दिली होती. याप्रकरणी खार पोलिसांनी ३० वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. विशेष म्हणजे हा संशयित आरोपी अर्पिताच्या घरात नोकर म्हणून काम करत होता.
संदीप हेगडे हा विलेपार्ले पूर्व येथील आंबेवाडी झोपडपट्टीत राहताे. अर्पिता खान शर्माच्या खार येथील घरात तो नोकर म्हणून काम करत होता. अर्पिताने तिच्या पोलिस तक्रारीत म्हटले आहे की,, तिचे ५ लाख रुपये किमतीचे हिऱ्याचे झुमके मेकअप ट्रेमध्ये ठेवले होते. ते चोरी गेले आहेत.
खारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन माने यांच्या नेतृत्वाखाली पीआय विनोद गावकर, पीएसआय लक्ष्मण काकडे, पीएसआय गवळी आणि तपास कर्मचार्यांचे पथकाने आरोपीचा शोध घेतला. चोरी करून संदीप हेगडे फरार झाला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.