महाविकास आघाडीतील घटकपक्षांमध्ये अद्यापही समावेश न झालेले वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेससंदर्भात गौप्यस्फोट केला. राष्ट्रवादीत बरेच राजकारण घडायचे आहे.
सध्या दोन बॉम्ब फुटलेत… अजून दोन बॉम्ब फुटायचे बाकी आहेत. त्यामुळे ‘वेट अँड वॉच’ जे काही बाहेर पडेल ते खरे बाहेर पडेल. त्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण स्थिर होईल, असे भाकीत आंबेडकर यांनी वर्तवले आहे.
अकोले येथील दंगलीसंदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकारणावर भाकीत केले. महाराष्ट्रात स्वतंत्र निवडणूक लढविण्याची परिस्थिती असल्याची काँग्रेसने भूमिका घेतली आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बरेच राजकारण घडायचे आहे, असे ते म्हणाले.