अमेरिकेसारख्या मोठ्या देशात सतत कोठेतरी गोळीबाराच्या घटना घडत असतात जगाच्या पाठीवरील इतर देशांमध्ये सुद्धा कधी ना कधी अशा घटना घडताना दिसतात याच पार्श्वभूमीवर स्वित्झर्लंडमध्ये एका सामाजिक संस्थेने या वाढत्या गन कल्चरचा अभ्यास केला असून त्याचे निष्कर्ष जाहीर केले आहेत.
या निष्कर्षाप्रमाणे जगभरातील देशांचा विचार करता सर्वात जास्त बंदुका अमेरिकेमध्ये आहेत अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशांमध्ये दर शंभर लोकसंख्येमागे बंदुकांची संख्या 120 आहे सर्वसाधारणपणे पाहता अफगाणिस्तान पाकिस्तान इराण किंवा इराक यासारख्या युद्धग्रस्त प्रदेशांमध्ये अशा शस्त्रांची संख्या जास्त असेल असा एक समज होता.
पण ह्या अभ्यासाने हा समज खोटा ठरवला असून अमेरिकेसारख्या सुसंस्कृत देशांमध्येच कौटुंबिक पातळीवर सुद्धा बंदुकांची संख्या वाढताना दिसत आहे.
अमेरिकेपाठोपाठ येमेन या देशामध्ये प्रतिव्यक्ती बंदुकांची संख्या जास्त आहे दर 100 व्यक्तींमागे येमेनमध्ये 54 लोकांकडे बंदूक आहेत सर्बियासारख्या देशांमध्ये हे प्रमाण 39 एवढे आहे.