Big News : पंतप्रधान मोदी सहा दिवसांच्या विदेश दौऱ्यावर रवाना

Photo of author

By Sandhya

पंतप्रधान मोदी सहा दिवसांच्या विदेश दौऱ्यावर रवाना

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या दौऱ्यावर शुक्रवारी रवाना झाले. सहा दिवस चालणाऱ्या या दौऱ्यात ते जपान, पापुआ न्यू गिनी तसेच ऑस्ट्रेलिया या देशांना भेटी देणार आहेत. जपानमध्ये जी – 7 देशांच्या राष्ट्र प्रमुखांची परिषद होणार असून त्या परिषदेतील मोदींच्या उपसि्थतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जपान दौऱ्यादरम्यान मोदी हे जपानचे पंतप्रधान किशिदा फुमिओ यांची भेट घेणार आहेत. जपानच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या जी – 7 शिखर परिषदेत मोदी विविध देशांच्या राष्ट्र प्रमुखांची भेट घेतील.

शांतता, सि्थरता, समृध्दी, अन्न सुरक्षा, खत आणि उर्जा सुरक्षा, आरोग्य, लैंगिक समानता, हवामान बदल आदी मुद्यांवर पंतप्रधान जी 7 परिषदेत बोलणार आहेत.

दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात मोदी पापुआ न्यू गिनीला जातील. या देशाचे पंतप्रधान जेम्स मारापे यांच्यासमवेत ते भारत-पॅसिफिक द्वीपसमूह सहकार्यासाठी होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होतील. तिसऱ्या टप्प्यात मोदी 22 ते 24 मे दरम्यान ऑस्ट्रेलियाचा दौरा करतील.

सिडनीमध्ये मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँटनी अल्बानीस यांची द्विपक्षीय बैठक होईल. ऑस्ट्रेलियातील भारतीय नागरिकांशीही मोदी संवाद साधणार आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page