BREAKING NEWS : चीनमध्ये नव्या व्हेरिएंटमुळे पुन्हा कोविड लाट

Photo of author

By Sandhya

कोविड

चीनमध्ये नव्या व्हेरिएंटमुळे पुन्हा कोविडची लाट आली आहे. कोरोनोच्या XXB या नवीन व्हेरिएंटचा येथील लोकांना मोठ्या प्रमाणात संसर्ग होत आहे. या पार्श्वभूमीवर चीनमधील आरोग्य विभाग सक्रिय झाला आहे.

दरम्यान जूनमध्ये चीनमधील या नवीन कोविड व्हेरिएंटमुळे रूग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे. जूनमध्ये आठवड्यात ६५ दशलक्ष (६ कोटी ५० लाख) लोकांना कोविड संक्रमण होऊ शकते, असे देखील एका अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

कोविडच्या या नवीन विषाणूच्या लाटेबाबत चिनी अधिकारी आधीच सतर्क असल्याचे दिसत आहे. कोविडच्या या नवीन व्हेरिएंट संक्रमणाला सामोरे जाण्यासाठी चिनी अधिकारी देशातील नागरिकांना कोविड लसींचा आग्रह धरत आहेत.

या संदर्भात असा अंदाज वर्तवला जात आहे की, जूनपर्यंत कोविडचा हा नवीन विषाणू संपूर्ण चीनमध्ये वेगाने पसरेल आणि त्या दरम्यान सुमारे ६५ दशलक्ष लोकांना याचे संक्रमण होईल; असा दावा एका अहवालातून करण्यात आला आहे. वॉशिंग्टन पोस्टच्या मते, येणारे वर्ष नवीन बदलांमुळे युनायटेड स्टेट्समध्ये संक्रमणांमध्ये वाढ झाली आहे.

सार्वजनिक आरोग्य आणीबाणी ११ मे रोजी संपली आहे. तरी तज्ज्ञांनी असे घोषित केले गेले आहे की, नवीन प्रकारांमुळे आजारांची आणखी एक लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Leave a Comment