BIG NEWS : हैदराबादमध्ये नवपाषाणयुगातील दगडी अवजारांचा शोध

Photo of author

By Sandhya

दगडी

पुरातत्त्व संशोधकांनी येथे प्रथमच नवपाषाणयुगातील दगडी अवजारांचा शोध लावला आहे. त्यावेळी अस्तित्वात असलेला मानव अशा अवजारांचा विविध कारणांसाठी वापर करीत असे व शेतीलाही सुरुवात झाली होती.

सेवानिवृत्त सरकारी पुरातत्त्व अधिकारी ई. शिवनागी रेड्डी यांनी सांगितले की शहरात प्रथमच नवपाषाण युगातील अवजारांचा शोध लागला आहे.

प्रख्यात पुरातत्त्व संशोधक आणि ‘प्लीच इंडिया फाऊंडेशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी रेड्डी यांनी सांगितले की त्यांना आणि तेलंगणाच्या इतिहासावर काम करीत असलेल्या एका संस्थेचे हरगोपाल अलीकडेच शहरातील बीएनआर हिल्समधील नैसर्गिकरीत्या बनलेले खडक पाहण्यासाठी गेले होते.

त्यांना स्थानिक लोक ‘टॉरटॉईज रॉक’ म्हणून ओळखतात. तिथे प्रागैतिहासिक काळातील शैलचित्रे आहेत का हे पाहण्याचा त्यांचा उद्देश होता. त्यांना दोन दगडांच्या दरम्यान अंतर दिसले व तिथे नवपाषाण युगातील दोन दगडी अवजारे आढळली. त्यापैकी एकाची लांबी 12 सेंटीमीटर आणि दुसर्‍याची नऊ सेंटीमीटर आहे. दोन्ही अवजारे इसवी सन पूर्व 4 हजार ते दोन हजार वर्षांपूर्वीची आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page