नव्या विशाल संसद भवनाचे आज लोकार्पण होणार असल्याने देशाच्या इतिहासात 28 मे 2023 ही तारीख सुवर्णाक्षरांनी नोंद केली जाईल. नवे संसद भवन म्हणजे देशवासीयांसाठी अभिमानाचा मानबिंदू ठरणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे सौंदर्य आणि भव्यता यांचा मनोहारी मिलाफ आहे. तब्बल 13 एकर क्षेत्रावर उभारण्यात आलेले हे संसद भवन पूर्णपणे भूकंप प्रतिरोधक आणि अद्ययावत डिजिटल तंत्रज्ञान सुविधांनी युक्त आहे.
नव्या विशाल संसद भवनाचे लोकार्पण आज, 28 मे 2023 रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या सोहळ्याला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची किनार सोहळ्याला लाभली आहे. शिवाय मोदी सरकारच्या नऊ वर्षपूर्तीची पार्श्वभूमीदेखील आहे. नवी वास्तू किती भव्य आहे याची कल्पना काही उदाहरणांवरून येऊ शकेल.
संसदेच्या नव्या इमारतीत एकाचवेळी 1200 हून अधिक खासदारांसाठी आसन व्यवस्था आहे. यामध्ये लोकसभेत 888 तर राज्यसभेत 384 खासदार बसू शकतात. देशाचा संसदीय इतिहास नव्याने लिहिला जाईल तेव्हा ही वास्तू म्हणजे त्यातील सोनेरी पान ठरेल यात शंका नाही. यापूर्वीचे ब्रिटिश राजवटीत बांधलेले संसद भवन भारताच्या 97 वर्षांच्या राजकीय व संसदीय इतिहासाचे साक्षीदार होते.
आता ते जुने झाले असून तिथे सुविधाही कमी पडत होत्या. त्यामुळे नव्या संसद भवनाची निकड प्रकर्षाने भासू लागली होती. साहजिकच हे नवे संसद भवन म्हणजे देशाचा मानबिंदू ठरणार आहे. सौंदर्य आणि भव्यता यांचा मनोहारी मिलाफ यामध्ये साधला आहे. कोणी कितीही आक्षेप घेतले तरी अशा वास्तूची गरज देशाला होतीच.