दिवंगत ज्येष्ठ सिने अभिनेते निळू फुले यांची कन्या अभिनेत्री गार्गी फुले आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश करणार आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जयंत पाटील यांच्या उपस्थितीत गार्गी फुलेंचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होणार आहे.
दरम्यान, गार्गी फुले यांनी मळभ, सोनाटा, सुदामा के चावल यासारख्या अनेक नाटकांमध्ये काम केले आहे. याशिवाय त्यांनी तुला पाहते रे, कट्टी बट्टी, राजा राणी ची गं जोडी, सुंदरा मनामध्ये भरली या टीव्ही मालिकांमध्ये गार्गी फुले यांनी काम केले आहे.
तर पोस्टर गर्ल, आंबेडकर, मी र. धों. कर्वे, रिश्ते या चित्रपटांमध्येही त्यांनी उत्तम भूमिका साकारल्या आहेत.