कोयताधारी टोळ्यांची दहशत मधल्या काळात कमी झालेली असताना पुन्हा एकदा कोयताधारी टोळ्यांनी डोके वर काढल्याचा प्रकार समोर आला आहे.
दत्तवाडी पोलिस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले असून एक गुन्हा खुनाचा प्रयत्न, तर दुसरे दोन गुन्हे गंभीर जखमी केल्याप्रकरणी दाखल झाले आहेत.
तीन गुन्ह्यांपैकी दोन गुन्हे हे परस्परविरोधी आहेत. पहिल्या गुन्ह्यात किरकोळ बाचाबाचीचा जाब विचारण्यासाठी गेलेल्यांवर कोयत्याने वार करत खुनाचा प्रयत्न करून दगडफेक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या चार ते पाच साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किशन उर्फ दिनेश गौड (19), राकेश रमेश सोरटकर (21) आणि रितेश रमेश सोरटकर (18, तिघेही रा. जनता वसाहत) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत दत्तात्रय कानगुडे (26, रा. जनता वसाहत, पर्वती) यांनी दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.