राज्यसेवा परीक्षा देण्यासाठी सातारा या ठिकाणी चाललेल्या परीक्षार्थींनी बस अचानक बिघडली. परिक्षा केंद्रावर वेळेत न पोहचल्यास वर्ष वाया जाणार या काळजीत असणाऱ्या या भावी अधिकाऱ्यांच्या मदतीला एक माजी राज्यामंत्री, एक माजी उपसरपंच व एसटीचे सेवानिवृत्त अधिकारी धावून आले आणि परीक्षार्थी भावी अधिकारी वेळेवर परीक्षेच्या ठिकाणी पोहचले
रविवारी सकाळी बारामती परिसरातून राज्य सेवा आयोजाची परीक्षा देणारे परीक्षार्थी बारामती-कोल्हापूर नीरा मार्गे जाणाऱ्या बसने ५५ विद्यार्थी व काही प्रवासी प्रवास करत होते. नीरा (ता.पुरंदर) बस स्थानकातून ही बस सात वाजता कोल्हापूरकडे निघाली. लोणंद (ता.खंडाळा) नजिकच्या रेल्वे उड्डाणपूलावर या बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने बंद पडली.
कोणाला काही सुचेना थोडाजरी वेळ वाया गेला तरी या विद्यार्थ्यांच वर्ष वाया जाणार याची धास्ती सर्वांना लागली. मुलांना नऊ वाजेपर्यंत सातारा येथील परीक्षा केंद्रावर पोहोचणे गरजेचे होते.
याच बस मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना युवक राज्याध्यक्ष अमरसिंह कदम प्रवास करत होते. कदम यांनी वेळेचे महत्व ओळखत त्यांचे दाजी नीरेचे माजी उपसरपंच दिपक काकडे यांना फोन केला. सर्व परिस्थिती सांगितली, खाजगी बस किंवा काही वाहनांची सोय होईल का? अशी मदत मागीतली. काकडे यांनी सकारात्मकता दर्शवत तात्काळ फोना फोनी करण्यास सुरवात केली.
त्याच वेळी काकडे यांनी सोमेश्वरचे रहिवाशी सेवानिवृत्त एसटीचे अधिकारी रमाकांत गायकवाड यांना फोन केला. याच दरम्यान गायकवाड यांना माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा ही फोन आला. सलग फोन येत असल्याने त्यांनी तिसऱ्यांदा फोन उचलला तो काकडे यांचा होता. त्यांनी बारामती आगाराची बारामती कोल्हापूर बस बाबत सांगत या बसमध्ये राज्यसेवा आयोगाच्या परिक्षार्थी असल्याचे सांगितले.
माजी राज्यमंत्री भरणे यांनी ही याच कारणासाठी फोन केला होता. गायकवाड यांनी तातकाळ बारामती आगार व नंतर नीरा बस स्थानकात फोन करुन ०८ वाजता सुटणारी नीरा सातारा ही सातारा विभागाची बस आता ०७.३५ ला सोडा आणि ती सर्व मुले घेवून जायला नीरा बस स्थानक प्रमुख सतिशचंद्र कुलकर्णी यांना सांगीतले.
राज्य सेवा परिक्षेचे हे विद्यार्थ्यांना सकाळी ०९.३० पर्यंत सातारा परिक्षा केंद्रावर पोहचणे गरजेचे होते. ०७.३५ ला नीरेतून निघालेल्या बसने बरोबर पाच ते दहा मिनिटांमध्ये त्या ठिकाणी पोचून सर्व विद्यार्थ्यांना घेऊन साताऱ्याच्या दिशेने वेगाने गेली.
थोड्या वेळानंतर एसटी मधील सर्व मुलांनी काकडे यांना फोन करुन आभार व्यक्त केले. हे सर्व विद्यार्थी ठीक ०९ वाजता सातारा बस स्थानकात सोडले आणि त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
यादरम्यान या विद्यार्थ्यांना प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. पण अशी कठीण परिस्थिती कशा पद्धतीन हताळावी याचा परिक्षेआधीच अनुभव आला.
सोशल मिडियाच्या माध्यमातून दिपक काकडे यांनी महिना भरापूर्वी सेवानिवृत्त झालेल्या रमाकांत गायकवाड यांनी तत्परता दाखवत एसटी प्रशासनावर आपला असलेला पगडा सिद्द केल्याने आभार मानले.
गायकवाड यांनी ही सेवानिवृत्ती नंतरही माला लोक कमाची संधी देतायेत याचे कौतुक केले. तर या घटनेतील जास्ती जास्त मुले आजची परीक्षा पास होवून अधिकारी होवो यासाठी श्री सोमेश्वर चरणी प्रार्थना करत असल्याची पोस्ट टाकली.
दिवसभर माजी राज्य मंत्री दत्तात्रय भरणे, राज्य परिवहन विभागाचे माजी विभाग नियंत्रक रमाकांत गायकावाड, स्वाभिमानी शेतकरी संघटना युवक राज्याध्यक्ष अमरसिंह कदम, नीरेचे माजी उपसरपंच दिपक काकडे यांचे अभिनंदन करत कौतुक करण्याचे मेसेज येत होते.