BRAKING NEWS : गँगस्टर संजीव जीवा याची गोळ्या झाडून हत्या

Photo of author

By Sandhya

संजीव जीवा

उत्तर प्रदेशमधील लखनौ न्यायालयात अज्ञात हल्लेखोरांनी गँगस्टर संजीव जीवा याची गोळ्या झाडून हत्या केली. ही धक्‍कादायक घटना आज सकाळी घडली. न्‍यायालयात झालेल्‍या गोळीबारात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे.

जीवाला एका फौजदारी खटल्याच्या सुनावणीसाठी आज लखनौ न्यायालयात आणण्यात आले होते. यावेळी न्‍यायालयात वकिलांच्या वेशात आलेल्‍या हल्‍लेखोरांनी संजीव जीवावर गोळीबार केला.

यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. या हल्ल्यात एक पोलीस हवालदारही जखमी झाला असून त्याला लखनौ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

संजीव जीवा हा माफिया मुख्तार अन्सारीचा साथीदार होता. आमदार ब्रह्मदत्त द्विवेदी यांच्या खून प्रकरणात तो सहआरोपी होता. गोळीबारानंतर लखनौ न्यायालयात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page