Sharad Pawar : हिंमत असल्यास खुले आम स्वतःच्या नावासह धमकी देऊन दाखवावी

Photo of author

By Sandhya

धमकी

 ‘तुमचाही दाभोलकर करू’ अशी धमकी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांना एका अज्ञाताने दिल्याचे वृत्त आहे. त्यांच्या केसालाही धक्का लावणारा अजून जन्माला आला नाही.

आणि काही भंपक लोक स्वतःची ओळख लपवून सोशल मीडियावरून धमकी देत आहेत. त्याच्यात हिंमत असल्यास खुले आम स्वतःच्या नावासह धमकी देऊन दाखवावी.

अशा नपुंसक लोकांच्या धमक्‍याला कोणीही भीक घालत नाही, अशी प्रतिक्रिया “उपरा’कार लक्ष्मण माने यांनी दिली. खा. शरद पवार यांना आलेल्या धमकीच्या पार्श्‍वभूमीवर लक्ष्मण माने म्हणाले, “”शरद पवार यांच्या पाठीशी अखंड महाराष्ट्र उभा आहे. समाजाला दिशा देऊन परिवर्तन घडवणाऱ्यांना नेहमीच इथे अशा धमक्‍यांचा सामना करावा लागला आहे.

अशाच वृत्तींनी डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे या समाजसुधारकांचा खून केला. त्यामुळे माझी सरकारला विनंती याचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने याची चौकशी करावी. धमकी देणाऱ्याला शोधून काढून दोषीला शिक्षा करावी.

शरद पवार यांना आलेली धमकी निषेधार्ह असून सरकारने ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे. शरद पवार यांची लोकप्रियता काही लोकांना खटकत असून वयाच्या 84 व्या वर्षी ज्या उमेदीने शरद पवार काम करत आहेत.

त्यामुळे अनेकांचे मनसुबे धुळीला मिळाले आहेत.” अशा धमक्‍यांना शरद पवार आणि त्यांचे समर्थक मुळीच भीक घालत नसल्याची प्रतिक्रिया लक्ष्मण माने यांनी व्यक्त केली.

Leave a Comment