राज्यातील कमाल तापमानाचा पारा कमी झाला आहे. आता मान्सूनपूर्व पावसाची शक्यता वाढली आहे. येत्या 48 तासांत मान्सून गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात 14 जूनपर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वार्यासह पाऊस हजेरी लावणार आहे, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
राज्यात शनिवारी वर्धा येथे कमाल तापमानाचा पारा 42.8 अंश सेल्सिअसच्या आसपास होता; तर उर्वरित शहराचा तापमानाचा पारा 40 अंशांच्या आसपास राहिला. दरम्यान, पुढील काही दिवस उन्हाचा तडाखा राहणार असला, तरी पावसाची हजेरी असणार आहे.
पुणे शहर आणि आसपासच्या भागातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज आहे.