श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा आज सातारा जिल्ह्यात

Photo of author

By Sandhya

श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज यांचा पालखी सोहळा आज सातारा जिल्ह्यात प्रवेश

श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज यांचा पालखी सोहळा आज सातारा जिल्ह्यात प्रवेश करीत आहे. यावर्षी जिल्ह्यात पाच मुक्कामांसाठी पालखी सोहळ्याचे आगमन होते आहे.

यापैकी पहिला अडीच दिवसाचा मुक्काम लोणंद येथे असणार आहे. लोणंदमधील मुक्काम आटोपल्यानंतर पुढील मुक्कामासाठी फलटण तालुक्‍यातील तरडगाव हद्दीत माउलींचे पहिले ऊभे रिंगण होऊन संध्याकाळी तरडगाव येथे वैष्णवांचा मेळा विसावेल.

जिल्ह्यात आगमन होताच पाडेगाव हद्दीत दत्तघाट येथे माउलींच्या पादुकांना नीरा स्नान होणार असून त्यानंतर जिल्हा परिषदेच्यावतीने  माउलींचे स्वागत समता आश्रम शाळेसमोर करण्यात येणार आहे. या ठिकाणी प्रशासनाच्यावतीने मंडप उभारून सुशोभिकरण करण्यात आले आहे.

यावेळी आगमन सोहळ्याला लोकप्रतिनिधी तसेच सर्व विभागातील प्रशासकीय अधिकारी वर्ग उपस्थित राहणार आहेत. सोहळा कालावधीत पालखी मार्गावर व मुक्कामाच्या ठिकाणी वारकऱ्यांना जलद आरोग्यसेवा देण्यासाठी वैद्यकीय मदत पथके व फिरती पथके कार्यरत असणार आहेत.

याचबरोबर साथीचे आजार पसरू नयेत यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असून त्यासाठी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे.

Leave a Comment