धावत्या शिवशाही एसटीला आग

Photo of author

By Sandhya

धावत्या शिवशाही एसटीला आग

पुणे-नाशिक महामार्गावर चाकण (ता. खेड) येथील तळेगाव चौकामध्ये नाशिककडून पुणेकडे येणार्‍या शिवशाही एसटी बसने (एमएच 09 ईएम 2607) दुपारी बाराच्या सुमारास अचानक पेट घेतला.

या वेळी बसमध्ये 25 प्रवासी प्रवास करीत होते. एसटीला आग लागल्याचे समजताच प्रवाशांना तातडीने खाली उतरविण्यात आले. त्यानंतर अवघ्या 15 मिनिटांत चाकण नगरपरिषदेचा अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला.

अवघ्या काही मिनिटांत आग शांत केली. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, महामार्गावर घडलेल्या घटनेमुळे रस्त्याच्या दुतर्फा मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

संबंधित एसटीच्या चाकांचे ड्रम लायनर गरम होऊन टायरने पेट घेतल्याचे चालक दीपक निकाळे यांनी सांगितले. चाकण वाहतूक शाखेने अवघ्या तासाभरात वाहतूक पूर्ववत केली.

Leave a Comment