दौंड तालुक्यात धक्कादायक प्रकार!वरवंड येथे पत्नी व मुलांचा खून करून डॉक्टरची आत्महत्या

Photo of author

By Sandhya

पत्नी व मुलांचा खून

दौंड तालुक्यातील वरवंड येथे राहणाऱ्या एका डॉक्टरने आपल्या पत्नी व दोन मुलांचा खून करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पोलिसांना घटनास्थळी आढळून आलेल्या चिठीच्या सहाय्याने समजले की, एकाने पत्नी व दोन मुलांची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची हृदय पिळवटून टाकणारी ही घटना आहे.

डॉ अतुल शिवाजी दिवेकर (वय 40 वर्ष) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी आपली पत्नी पल्लवी अतुल दिवेकर (वय 36 वर्ष), वेदांतीका (मुलगी, वय 6 वर्ष), अदत्विक (मुलगा, वय 9 वर्ष) यांची प्रथम हत्या केली व त्यानंतर त्यांनी स्वतः गळफास घेउन आत्महत्या केली.

अतुल शिवाजी दिवेकर वरवंड येथील चैताली पार्क येथे कुटुंबासोबत राहत होते. दुपारी बाजूच्या व्यक्तींनी घरात पाहणी केली असता त्यांना अतुल हा गळफास घेतलेल्या अवस्थेत तर पत्नी खाली पडल्याचे दिसून आले.

सदर माहिती मिळताच यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. यावेळी डॉ. अतुल हे गळफास घेतलेल्या अवस्थेत तर पत्नीचा दोरीने गळा आवळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.


यावेळी पाहणी करताना घटनास्थळी चिठी सापडली. यामध्ये “मी पत्नीचा गळा आवळून व दोन मुलांना विहिरीत टाकून त्यांचा खून केला, तर मी स्वतः आत्महत्या करीत आहे ” असे नमूद होते. त्यानुसार पोलिसांनी संबंधीत विहिरीच्या ठिकाणी पाहणी केली.

विहिरीमध्ये दोन्ही मुलांच्या चप्पल पाण्यामध्ये तरंगताना दिसल्या, विहिरीतील पाणी जास्त असल्याने मुलांचे मृतदेह शोधण्यासाठी सुमारे 6 तासांचा कालावधी लागला असुन दोन्ही मुलांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. या घटनेचे अद्याप ठोस कारण समजू शकले नाही. पुढील अधिक तपास यवत पोलीस करत आहेत.

Leave a Comment