शिवसेना खासदार संजय राऊत यांना महानगर दंडाधिकारी न्यायालयाने चांगलाच दणका दिला. राऊत यांनी ट्विटर विरोधात दाखल केलेला खटला मुख्य महानगर दंडाधिकारी संग्राम बाळासाहेब काळे यांनी रद्द केला.
गेल्या वर्षभरात राऊत अथवा त्यांचे वकील सुनावणीवेळी गैरहजर राहिल्याने न्यायालयाने हा निर्णय घेतला.
खासदार संजय राऊत यांनी दोन वर्षांपूर्वी आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करणार्या ट्विटर्स, गुगल आणि यू ट्यूब विरोधात महानगर दंडाधिकारी न्यायालयात खटला दाखल करून आक्षेपार्ह मजकूर हटविण्याचे आदेश देण्याची विनंती केली होती.