परळीत दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत आज तुफान राडा झाला. यामध्ये एक जण ठार झाल्याची खळबळजनक घटना कन्या शाळा रोड ते बरकत नगर रस्त्यावर घडली आहे.
बाबत मिळालेल्या माहितीनुसार, एका लग्न समारंभात हा राडा झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मयत इसम व जखमींना रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
दोन गटांत अचानक वाद झाला हा वाद मारामारीपर्यंत पोहचला.एकमेकांवर प्रत्येकजण अक्षरश: तुटून पडले. यामध्ये एकजण ठार झाला आहे.अल्लाउद्दीन शेख रा.नागापूर असे मयत ईसमाचे नाव आहे.
दरम्यान घटनास्थळी प्रचंड जमाव जमा झाला. पोलीस घटनास्थळावर पोहचले असुन परिस्थिती नियंत्रणात आहे.अधिक तपास पोलीस करत आहेत. दरम्यान या मारामारी मध्ये मयत झालेले इसम अल्लाउद्दीन शेख हे नागापूर येथील रहिवासी असून नागापूर येथे त्यांची पान टपरी आहे. नागापूर परिसरात ते सर्व परिचित असून या हाणामारीत त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.