दारूच्या नशेत आपल्या मुलीवर बलात्कार करणार्या नराधम बापावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने गुन्हा करूनही तो लपविण्याचा प्रयत्न करणार्या तिच्या आईवरही वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार चार महिन्यांपासून सुरू होता.
याप्रकरणी मुलीने तिच्या मित्राला याबाबत सांगितल्यानंतर त्याने पीडित मुलीच्या आईला विचारले असता, त्याच्या आईने त्याला बघून घेण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
तिने नवर्याची पोलिस तक्रार केली, तर मी तुला व तुझ्या मित्राला सोडणार नाही, अशी धमकी दिल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.