PUNE : चांदणी चौकात खासगी टेम्पो ट्रॅव्हलर पलटी

Photo of author

By Sandhya

चांदणी चौकात खासगी टेम्पो ट्रॅव्हलर पलटी

सतत वर्दळ असलेल्या आज सकाळी चांदणी चौकात खासगी टेम्पो ट्रॅव्हलर पलटी झाला. यात प्रवास करणारे  चारही जण किरकोळ जखमी झाल्याचं समजत आहे.

या दरम्यान चांदणी चौकात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार हा टेम्पो कर्वेनगरहून हिंजवडीच्या दिशेने जात होता.

चांदणी चौकादरम्यान त्याचा स्टेअरिंग रॉड तुटला. दरम्यान सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं समोर येत आहे. दरम्यान वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी टेम्पो रस्त्यातून बाजूला करण्याचे काम वेगाने सूरु आहे.

Leave a Comment