२० हजारांची लाच घेताना तलाठी पोलिसाच्या ताब्यात

Photo of author

By Sandhya

२० हजारांची लाच घेताना तलाठी पोलिसाच्या ताब्यात

सातबारा उताऱ्यावर नोंद करून देण्याच्या मोबदल्यात २० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या तलाठी सचिन काशीनाथ म्हस्के (३८, रा. तपोवन लिंक रोड, उत्तरानगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घोटी येथील तक्रारदाराने इगतपुरी तालुक्यातील मुरंबी गावात शेती खरेदी केली. त्यानुसार सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी तक्रारदाराने म्हस्के यांच्याशी संपर्क साधला, त्यावेळी त्याने २० हजार रुपयांची लाच मागितली.

त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून १ जुलैला सायंकाळी गोविंदनगर ते इंदिरानगर दरम्यान कारमध्ये लाचेची रक्कम स्वीकारताना म्हस्के यास पकडले.

त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे निरीक्षक संदीप घुगे यांच्या फिर्यादीनुसार, मुंबईनाका पोलिस ठाण्यात म्हस्केविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Leave a Comment

You cannot copy content of this page