व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती मध्ये वाढ

Photo of author

By Sandhya

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती मध्ये वाढ

सरकारी तेल कंपन्यांनी व्यावसायिक वापरातील एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती प्रति सिलेंडर 7 रुपयांनी वाढवल्या आहेत. या वाढीनंतर दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किरकोळ विक्री किंमत 1,773 रुपयांवरून 1,780 रुपये झाली आहे.

मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 1,733.50 रुपयांवरून 1,740.50 रुपये,

चेन्नईमध्ये 1,945 रुपयांवरून 1,952 रूपये आणि कोलकातामध्ये 1,895 रुपयांवरून 1,902 रूपये इतकी झाली आहे.

सरकारी तेल कंपन्या साधारणपणे दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किमतीत सुधारणा करतात. गेल्या वर्षी 1 सप्टेंबर रोजी व्यावसायिक सिलिंडरच्या किमती 91.50 रुपयांनी कमी झाल्या होत्या.

1 ऑगस्ट 2022 रोजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती 36 रुपयांनी कमी करण्यात आल्या होत्या.

Leave a Comment

You cannot copy content of this page